Friday, December 30, 2011

नवं वर्ष ...!!!


एक वर्ष संपत आणि नवीन वर्ष सुरु होत ...
कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत ... 
खर तर काय बदलत ? कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे ....
पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ...


दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....?????
संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ...

याच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना ????
चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला !!!???
खूष होत असेल की घाबरत असेल ???


जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी ??? मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का ???? 


खूष होत असेल न येणार वर्ष ,आपल  आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा !!! नक्कीच वाटत असणार ;)


ठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून ????
नशीब म्हणून जी काही चीज मानतो आपण,  त्याची बारा महिन्यांच्या मुदतीची कंत्राट निघत असतील न ..!!! 
आणि कंत्राटदार दर वेळी नवा .... नवं वर्ष !!!!


घाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...!!
आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...!!!


एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल ,, खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...!!!

वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...!!!

एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून ....
किंवा एखाद वर्ष खूष होत असेल  , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून !!!

जाऊ दे ...  सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवते ....
संकल्पाच नाहीच ठरत आहे अजून ...!!!!




Friday, July 1, 2011

किल्ले देवगिरी


          आत्ता पर्यंतची माझी हि सगळ्यात मोठ्ठी सुट्टी आहे ... आणि महिनाभर निवांत घरी काढल्यानंतर गेल्या आठवड्यात पूर्ण  फिरतीवर होते मी ....

           तशी मी पक्की NH4 वर जगलेली मुलगी आहे ... मूळ गाव , आजोळ ,राहत गाव , स्थलांतरित आजोळ (!), उरलेले सारे नातेवाईक ...सगळे सगळे NH 4 वर च्या गावात ...फार फार तर १० -२० KM आजूबाजूला ...त्यामुळ उरलेल्या महाराष्ट्राशी फारशी  ओळख नाहीये माझी .... मला खानदेश , विदर्भ , मराठवाडा इत्यादी भागात नेमके कोणते जिल्हे येतात हे खूप उशिरा समजल ...(किंबहुना अजून हि perfect माहिती आहे असा दावा नाही करू शकत मी )

           तर मुद्दा असा , की गेल्या विकांताला मी औरंगाबाद ला गेले होते ....  :)

            तिथे जाताना planning होते की दोन दिवसात अजिंठा-वेरूळ बघून घेऊ ...साधारण map बघितल्यावर मात्र जाणवलं की अजिंठा आणि वेरूळ यात बर च अंतर आहे .... पुणे - मुंबई म्हणतात त्यातला च प्रकार ...!!! मग ठरवलं की फक्त वेरूळ बघू .... आणि final discussion नंतर ठरलं कि आधी देवगिरी चा किल्ला बघू मग वेळ राहिला तर वेरूळ .. !!
औरंगाबाद पासून फक्त १० km वर देवगिरी आहे ..... दौलताबाद ...!!
         
            या किल्ल्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती पण अप्रूप नक्की च होत ...एके काळाची यादवांची राजधानी ...आणि वेड्या तुघलकानेही त्याची राजधानी देवगिरी ला नेण्याचा प्रयत्न केला होता ...हे आठवत होत मला ..!!


            आम्ही दमदमीत नाश्ता करून जवळपास १० वाजता औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचलो ...! जरा चौकशी केल्यावर कळलं कि कन्नड बस थांबते देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी .... मी माझ या भागाबद्दल च अज्ञान आधी च मान्य केलाय ... त्याचा च किस्सा ...त्या गृहस्थांनी इथ कन्नड लिहिलेली बस येईल म्हटल्यावर माझ्या मनात हजार शंका !!! मुळात आपल्याला कन्नड लिहिलेलं कळणार कस ? हे लोक कर्नाटक चा संदर्भ असा 'कन्नड' म्हणून का देतात ?? आणि तसं ही अस नुसत कन्नड म्हणून कस चालेल ...त्या राज्यात म्हणजे exact कुठे ???  शिवाय औरंगाबाद कुठ कर्नाटका सीमेवर आहे कि इथून सारख्या कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या असाव्यात ..

            माझ्या चेहऱ्यावरची प्रश्नचीन्ह बघून मी काही अक्कल पाजलावण्याचा आत माझे प्रश्न सोडवणे हे कसब माझ्या जवळच्या माणसांना  प्राप्त आहे  ;)  
मला हळूच  सांगितलं गेलं ...कन्नड नावच गाव आहे इथ जवळ च .... !


        लाल गाडी चा प्रवास करून गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही ...

        किल्ल्याच प्रथम दर्शन च देखण आहे .... मोठ्ठी तटबंदी ...खूप खूप खूप च मोठ्ठी ...!! आणि अजून ही बर्याच अंशी शाबूत असलेली .... !  पुढ बर च अंतर चालून गेल्यावर चांद मिनार ची भव्य वास्तू ... हि उंच इमारत देखरेखीसाठी आणि मुख्य म्हणजे विजयाचे प्रतिक म्हणून बांधली गेली अशा आशयाचा फलक शेजारीच ..!!! यात वरपर्येंत  जाण्यास मात्र परवानगी नाही .... 


       थोड अजून चालाल कि दिसत मुख्य  प्रवेशद्वार ...! आणि प्रवेशिका देण्यासाठी उभारलेले भारत सरकार चे छोटेसे पुरातत्व विभागाचे office ... फी फक्त ५ रुपये ;) आणि तिकीट एकदम भारी कागदावर छापलेले ... परिणामी यातील एक हि रुपया सरकार  खाती जमा होत नसणार हा मनात येणारा पहिला विचार ....!

      आत गेल्यागेल्याच किल्ला आपल्याला त्याच्या कर्तबगारीच्या दिवसात घेऊन जातो ... समोर दिसतात खूप तोफा ....... लहान मोठ्या आकाराच्या आणि जवळ लांब पल्ल्याच्या .... नेहमी प्रमाणे आजूबाजूला , त्या तोफेला ढकलतानाची acting करत किंवा  तोफेवर बसून शाही pose देऊन किंवा तोफेतून आलेला गोळा आपल्या अंगावर येतोय अशा आविर्भावान फोटो काढणारे भरपूर पर्यटक होते च ... :) 
      
        तोफखान्यातून पुढ अजून थोड चढून गेल कि एका बुरुजावर आहे मेंढा तोफ ... या किल्ल्याच मुख्य आकर्षण .... तुमच्या कॅमेऱ्याच्या frame मध्ये बसणार नाही इतकी मोठ्ठी , अत्यंत देखणी  आणि इतक्या वर्षांचा उन पाऊस सोसूनही रुबाबदार आणि तुकतुकीत राहिलेली बलदंड तोफ ...!!! ज्या त्या काळात राजाच विशेष प्रेम असणार या तोफेवर ;)
       याच बुरुजावरून चांद मिनार पुन्हा दिसतो आणि साधारण त्याच्या टोकाला आपण बोट लावलंय अशा type चा फोटो काढायचा असेल तर हि त्यासाठी ची बेस्ट जागा ....


        किल्ला बांधताना किती दमले असतील लोक ... अजून निम्म वर्णन ही नाही झालेलं ...पण stamina संपला माझा लिहायचा ...
बाकी पुन्हा कधीतरी ...



        

Thursday, June 9, 2011

विश्वास

                         काही अनुभव खुपदा आपल्याही नकळत आपल्यासाठी अविस्मरणीय  ठरतात .... त्यात विशेष अस काहीही नसताना सुद्धा ....!!!!
                        तशी हि २ वर्षापूर्वीची गोष्ट आहे .... college  च 2nd year संपत आल  होत आणि माझी termwork assignments मुळ खूप गडबड चालू होती ...माझी चुलत बहिण नुकतीच तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा च घरी आली होती .... आमच घर अगदी एकत्र कुटुंब नाहीये पण आमच खूपस बालपण एकत्र गेलंय आणि मी तिची एकुलती एक लहान बहिण असल्यान ती हि माझी खूप वाट बघत असणार हे माहिती होत मला .... मी काकांकडे गेले आणि आमची गप्पाष्टक सुरु झाली ....!
                       थोड्या च वेळात  माझ्या लक्षात आल कि आमच्या गप्पांमध्ये दर २ वाक्यानंतर सचिन च नाव निघतंय ...! माझे जीजू ... ;) अर्थात सरळ होत ते ... पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीशी आपण तिच्या नवऱ्याबद्दल च  बोलतो mostly....पण नंतर हे हि लक्षात आल कि  बाईसाहेब  दुसर काही बोलत च नाहीयेत त्यांच्याशिवाय ...!!!! त्यांना काय आवडत ,,, काय नाही आवडत .... अस झाल तेव्हा ते काय म्हणाले ... तिथ गेलो तेव्हा सगळ्यांनी त्याचं कस कौतुक केल ...!!! प्रत्येक गोष्ट करताना जीजूंना आवडेल का ? हा च विचार ! बाप रे .... आता सांगताना गम्मत वाटतीय पण तेव्हा मला सचिन पुरण जरा अति च झालेलं .... घरी आल्यावर मी विचार करत होते ,.... खूप वेळ ... अशी कशी बदलली माझी ताई ..... तीच arrange marriage आहे ...म्हणजे hardly १० दिवसांचा सहवास ...आणि त्यात इतकी ताकद ..... ???? आपल्या आयुष्यातलं आपल्याहून महत्वाच स्थान दुसर्याला कुणी कस देऊ शकत ? आणि ते हि  इतक्याश्या ओळखीत ????
                       दिवस संपला पण तो विचार काही पूर्ण गेला नव्हता मनातून ....पण दुसरा दिवस उगवला तो submission च लाटण घेवून च ...!!!! engineering मध्ये हा एक जीवघेणा प्रकार असतो ... याबद्दल निवांत कधीतरी बोलता येईल ...सध्या विषयांतर नको ..!! final submission झाल आणि मी घरी येण्यासाठी निघाले .... हवा गेलेल्या फुग्यासारख माझ्या जीवात हि काही त्राण उरल नव्हत .....! विचार करणं लांब च पण सचिन पुराणाचा पुरता विसर पडला होता मला.... 
                     तेवढ्यात समोर एक देखण जोडप दिसलं .... सत्तरी ओलांडलेल ...!!! आज्जी भलत्या हौशी असाव्यात .... संध्याकाळ च्या वेळी अगदी  गजरा घालून फिरायला बाहेर पडण्याहून जास्ती काय certificate असत हौशी स्वभावाच ???!!! आणि आजोबा हि कोल्हापुरी  थाटात रुबाबदार दिसत होते .... तरुणपणात अगदी दृष्ट लागण्यासारख जोडप असणार हे ... अजून थोडी पुढ आले आणि मला जाणवलं  कि दिसण्यात फारस नाही पण चालण्यात वय दिसतंय यांच ...थरथरत एकमेकांचा हात धरून चालत होते दोघ हि ... नेमक कोण कुणाचा आधार आहे हे कळण्यासाठी  जरा निरखून बघितलं मी..आणि पुढच्या क्षणी मला जाणवलं कि या दोघांना हि चालण्यासाठी आधाराची गरज आहे ....! 
                      बस्स... मला उत्तर मिळाल ....! विश्वास ... एकमेकांवरचा विश्वास आहे जो त्यांना तसं खर तर अशक्य अशा गोष्टीत साथ देतोय ...!!! सहज शक्य बनवतोय .... आणि काल माझ्या  ताई च्या डोळ्यातले  भाव काय होते ते कळल मला....  आज्जी आजोबांना त्यांच्या ४०-५० वर्षांच्या सहजीवनान जो विश्वास मिळालेला एकमेकांबद्दल .... त्या विश्वासाचं , तशा नात्याचं स्वप्न काल ताई च्या नजरेत होत बहुतेक .... !
                      एक पक्क आणि जीवाभावाच  नात बनवण्याचे सुरुवातीचे  प्रयत्न होते ते तिचे.... :) 

Monday, June 6, 2011

ओळख :)


hi ... लिखाण हि अगदी मला जमणारी गोष्ट नाही ...पण  माझ्या आजूबाजूला अगदी भारी ब्लोग लिहिणारे जवळचे लोक आहेत ... म्हणून सध्या मी हि  try करायला काय हरकत आहे ...! असा विचार करून लिहीतीय .... :)

एक दोन पोस्ट्स च्या पुढे जाते का ते बघू ...!!!!