Thursday, June 9, 2011

विश्वास

                         काही अनुभव खुपदा आपल्याही नकळत आपल्यासाठी अविस्मरणीय  ठरतात .... त्यात विशेष अस काहीही नसताना सुद्धा ....!!!!
                        तशी हि २ वर्षापूर्वीची गोष्ट आहे .... college  च 2nd year संपत आल  होत आणि माझी termwork assignments मुळ खूप गडबड चालू होती ...माझी चुलत बहिण नुकतीच तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा च घरी आली होती .... आमच घर अगदी एकत्र कुटुंब नाहीये पण आमच खूपस बालपण एकत्र गेलंय आणि मी तिची एकुलती एक लहान बहिण असल्यान ती हि माझी खूप वाट बघत असणार हे माहिती होत मला .... मी काकांकडे गेले आणि आमची गप्पाष्टक सुरु झाली ....!
                       थोड्या च वेळात  माझ्या लक्षात आल कि आमच्या गप्पांमध्ये दर २ वाक्यानंतर सचिन च नाव निघतंय ...! माझे जीजू ... ;) अर्थात सरळ होत ते ... पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीशी आपण तिच्या नवऱ्याबद्दल च  बोलतो mostly....पण नंतर हे हि लक्षात आल कि  बाईसाहेब  दुसर काही बोलत च नाहीयेत त्यांच्याशिवाय ...!!!! त्यांना काय आवडत ,,, काय नाही आवडत .... अस झाल तेव्हा ते काय म्हणाले ... तिथ गेलो तेव्हा सगळ्यांनी त्याचं कस कौतुक केल ...!!! प्रत्येक गोष्ट करताना जीजूंना आवडेल का ? हा च विचार ! बाप रे .... आता सांगताना गम्मत वाटतीय पण तेव्हा मला सचिन पुरण जरा अति च झालेलं .... घरी आल्यावर मी विचार करत होते ,.... खूप वेळ ... अशी कशी बदलली माझी ताई ..... तीच arrange marriage आहे ...म्हणजे hardly १० दिवसांचा सहवास ...आणि त्यात इतकी ताकद ..... ???? आपल्या आयुष्यातलं आपल्याहून महत्वाच स्थान दुसर्याला कुणी कस देऊ शकत ? आणि ते हि  इतक्याश्या ओळखीत ????
                       दिवस संपला पण तो विचार काही पूर्ण गेला नव्हता मनातून ....पण दुसरा दिवस उगवला तो submission च लाटण घेवून च ...!!!! engineering मध्ये हा एक जीवघेणा प्रकार असतो ... याबद्दल निवांत कधीतरी बोलता येईल ...सध्या विषयांतर नको ..!! final submission झाल आणि मी घरी येण्यासाठी निघाले .... हवा गेलेल्या फुग्यासारख माझ्या जीवात हि काही त्राण उरल नव्हत .....! विचार करणं लांब च पण सचिन पुराणाचा पुरता विसर पडला होता मला.... 
                     तेवढ्यात समोर एक देखण जोडप दिसलं .... सत्तरी ओलांडलेल ...!!! आज्जी भलत्या हौशी असाव्यात .... संध्याकाळ च्या वेळी अगदी  गजरा घालून फिरायला बाहेर पडण्याहून जास्ती काय certificate असत हौशी स्वभावाच ???!!! आणि आजोबा हि कोल्हापुरी  थाटात रुबाबदार दिसत होते .... तरुणपणात अगदी दृष्ट लागण्यासारख जोडप असणार हे ... अजून थोडी पुढ आले आणि मला जाणवलं  कि दिसण्यात फारस नाही पण चालण्यात वय दिसतंय यांच ...थरथरत एकमेकांचा हात धरून चालत होते दोघ हि ... नेमक कोण कुणाचा आधार आहे हे कळण्यासाठी  जरा निरखून बघितलं मी..आणि पुढच्या क्षणी मला जाणवलं कि या दोघांना हि चालण्यासाठी आधाराची गरज आहे ....! 
                      बस्स... मला उत्तर मिळाल ....! विश्वास ... एकमेकांवरचा विश्वास आहे जो त्यांना तसं खर तर अशक्य अशा गोष्टीत साथ देतोय ...!!! सहज शक्य बनवतोय .... आणि काल माझ्या  ताई च्या डोळ्यातले  भाव काय होते ते कळल मला....  आज्जी आजोबांना त्यांच्या ४०-५० वर्षांच्या सहजीवनान जो विश्वास मिळालेला एकमेकांबद्दल .... त्या विश्वासाचं , तशा नात्याचं स्वप्न काल ताई च्या नजरेत होत बहुतेक .... !
                      एक पक्क आणि जीवाभावाच  नात बनवण्याचे सुरुवातीचे  प्रयत्न होते ते तिचे.... :) 

Monday, June 6, 2011

ओळख :)


hi ... लिखाण हि अगदी मला जमणारी गोष्ट नाही ...पण  माझ्या आजूबाजूला अगदी भारी ब्लोग लिहिणारे जवळचे लोक आहेत ... म्हणून सध्या मी हि  try करायला काय हरकत आहे ...! असा विचार करून लिहीतीय .... :)

एक दोन पोस्ट्स च्या पुढे जाते का ते बघू ...!!!!