Tuesday, April 30, 2013

मी मुक्तामधला मुक्त , तू कैद्यामाधला कैदी
माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी ?
माझ्यावर लिहिती गीते त्या मंद समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते गरुडाची दिव्य भरारी !
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसे होणार !?
माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार

आभाळ म्हणाले नाही धरणीही नाही म्हटली
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही
पापण्यात जळली लंका लाह्यांपरी आसू आले
उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्दा झाले
दगडाची पार्थिव भिंत मग पुढे अचानक सरली
मी कागद झाले आहे चाल लिही असे ती वदली !!

( शाळेत असताना वाचलेली … कुणाची आहे आठवत नाहीये :(  )