Friday, July 1, 2011

किल्ले देवगिरी


          आत्ता पर्यंतची माझी हि सगळ्यात मोठ्ठी सुट्टी आहे ... आणि महिनाभर निवांत घरी काढल्यानंतर गेल्या आठवड्यात पूर्ण  फिरतीवर होते मी ....

           तशी मी पक्की NH4 वर जगलेली मुलगी आहे ... मूळ गाव , आजोळ ,राहत गाव , स्थलांतरित आजोळ (!), उरलेले सारे नातेवाईक ...सगळे सगळे NH 4 वर च्या गावात ...फार फार तर १० -२० KM आजूबाजूला ...त्यामुळ उरलेल्या महाराष्ट्राशी फारशी  ओळख नाहीये माझी .... मला खानदेश , विदर्भ , मराठवाडा इत्यादी भागात नेमके कोणते जिल्हे येतात हे खूप उशिरा समजल ...(किंबहुना अजून हि perfect माहिती आहे असा दावा नाही करू शकत मी )

           तर मुद्दा असा , की गेल्या विकांताला मी औरंगाबाद ला गेले होते ....  :)

            तिथे जाताना planning होते की दोन दिवसात अजिंठा-वेरूळ बघून घेऊ ...साधारण map बघितल्यावर मात्र जाणवलं की अजिंठा आणि वेरूळ यात बर च अंतर आहे .... पुणे - मुंबई म्हणतात त्यातला च प्रकार ...!!! मग ठरवलं की फक्त वेरूळ बघू .... आणि final discussion नंतर ठरलं कि आधी देवगिरी चा किल्ला बघू मग वेळ राहिला तर वेरूळ .. !!
औरंगाबाद पासून फक्त १० km वर देवगिरी आहे ..... दौलताबाद ...!!
         
            या किल्ल्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती पण अप्रूप नक्की च होत ...एके काळाची यादवांची राजधानी ...आणि वेड्या तुघलकानेही त्याची राजधानी देवगिरी ला नेण्याचा प्रयत्न केला होता ...हे आठवत होत मला ..!!


            आम्ही दमदमीत नाश्ता करून जवळपास १० वाजता औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचलो ...! जरा चौकशी केल्यावर कळलं कि कन्नड बस थांबते देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी .... मी माझ या भागाबद्दल च अज्ञान आधी च मान्य केलाय ... त्याचा च किस्सा ...त्या गृहस्थांनी इथ कन्नड लिहिलेली बस येईल म्हटल्यावर माझ्या मनात हजार शंका !!! मुळात आपल्याला कन्नड लिहिलेलं कळणार कस ? हे लोक कर्नाटक चा संदर्भ असा 'कन्नड' म्हणून का देतात ?? आणि तसं ही अस नुसत कन्नड म्हणून कस चालेल ...त्या राज्यात म्हणजे exact कुठे ???  शिवाय औरंगाबाद कुठ कर्नाटका सीमेवर आहे कि इथून सारख्या कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या असाव्यात ..

            माझ्या चेहऱ्यावरची प्रश्नचीन्ह बघून मी काही अक्कल पाजलावण्याचा आत माझे प्रश्न सोडवणे हे कसब माझ्या जवळच्या माणसांना  प्राप्त आहे  ;)  
मला हळूच  सांगितलं गेलं ...कन्नड नावच गाव आहे इथ जवळ च .... !


        लाल गाडी चा प्रवास करून गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही ...

        किल्ल्याच प्रथम दर्शन च देखण आहे .... मोठ्ठी तटबंदी ...खूप खूप खूप च मोठ्ठी ...!! आणि अजून ही बर्याच अंशी शाबूत असलेली .... !  पुढ बर च अंतर चालून गेल्यावर चांद मिनार ची भव्य वास्तू ... हि उंच इमारत देखरेखीसाठी आणि मुख्य म्हणजे विजयाचे प्रतिक म्हणून बांधली गेली अशा आशयाचा फलक शेजारीच ..!!! यात वरपर्येंत  जाण्यास मात्र परवानगी नाही .... 


       थोड अजून चालाल कि दिसत मुख्य  प्रवेशद्वार ...! आणि प्रवेशिका देण्यासाठी उभारलेले भारत सरकार चे छोटेसे पुरातत्व विभागाचे office ... फी फक्त ५ रुपये ;) आणि तिकीट एकदम भारी कागदावर छापलेले ... परिणामी यातील एक हि रुपया सरकार  खाती जमा होत नसणार हा मनात येणारा पहिला विचार ....!

      आत गेल्यागेल्याच किल्ला आपल्याला त्याच्या कर्तबगारीच्या दिवसात घेऊन जातो ... समोर दिसतात खूप तोफा ....... लहान मोठ्या आकाराच्या आणि जवळ लांब पल्ल्याच्या .... नेहमी प्रमाणे आजूबाजूला , त्या तोफेला ढकलतानाची acting करत किंवा  तोफेवर बसून शाही pose देऊन किंवा तोफेतून आलेला गोळा आपल्या अंगावर येतोय अशा आविर्भावान फोटो काढणारे भरपूर पर्यटक होते च ... :) 
      
        तोफखान्यातून पुढ अजून थोड चढून गेल कि एका बुरुजावर आहे मेंढा तोफ ... या किल्ल्याच मुख्य आकर्षण .... तुमच्या कॅमेऱ्याच्या frame मध्ये बसणार नाही इतकी मोठ्ठी , अत्यंत देखणी  आणि इतक्या वर्षांचा उन पाऊस सोसूनही रुबाबदार आणि तुकतुकीत राहिलेली बलदंड तोफ ...!!! ज्या त्या काळात राजाच विशेष प्रेम असणार या तोफेवर ;)
       याच बुरुजावरून चांद मिनार पुन्हा दिसतो आणि साधारण त्याच्या टोकाला आपण बोट लावलंय अशा type चा फोटो काढायचा असेल तर हि त्यासाठी ची बेस्ट जागा ....


        किल्ला बांधताना किती दमले असतील लोक ... अजून निम्म वर्णन ही नाही झालेलं ...पण stamina संपला माझा लिहायचा ...
बाकी पुन्हा कधीतरी ...



        

5 comments:

aativas said...

मी देवगिरी पाहिलेला नाही अजून त्यामुळे मजा आली वाचताना. पुढे लिहिशील अशी अपेक्षा!
'कन्नड'चा किस्सा तुमच्या (म्हणजे युवा पिढीच्या) भाषेत बोलायचं तर भारी आहे :-)

अपर्णा said...

छान आहे लेख. मी माझ्या डिग्रीच्या admission साठी गेले होते तेव्हा लागे हातो पहिला होता किल्ला. तू फोटो पण टाकले असतेस तर मजा आली असती. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

apurva said...

@ सविता ताई, हो ग ..पूर्ण किल्ला सर करीन मी आणि मग च थांबीन :)
@ अपर्णा , धन्यवाद :) पुढच्या भागात फोटो हि add करीन ... नक्की ...!!

Pravin said...

Interesting Post!

निसर्गवार्ता said...

छान लिहिता!

Post a Comment