Wednesday, January 23, 2013

जिवंत

सगळ्यांनी सांगितलं ,
"नको पाणी घालू आता ,
ते झाड आहे वठलेल " ,
खर सांगायचं तर हे मला ,
त्यांच्याही आधी दिसलेलं ...

पण शेंडा जळला असला तरी ,
बुंधा तग धरून आहे ,
मला मनापासून वाटत ,
झाड अजून जिवंत आहे !

0 comments:

Post a Comment