Friday, December 30, 2011

नवं वर्ष ...!!!


एक वर्ष संपत आणि नवीन वर्ष सुरु होत ...
कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत ... 
खर तर काय बदलत ? कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे ....
पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ...


दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....?????
संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ...

याच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना ????
चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला !!!???
खूष होत असेल की घाबरत असेल ???


जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी ??? मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का ???? 


खूष होत असेल न येणार वर्ष ,आपल  आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा !!! नक्कीच वाटत असणार ;)


ठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून ????
नशीब म्हणून जी काही चीज मानतो आपण,  त्याची बारा महिन्यांच्या मुदतीची कंत्राट निघत असतील न ..!!! 
आणि कंत्राटदार दर वेळी नवा .... नवं वर्ष !!!!


घाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...!!
आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...!!!


एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल ,, खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...!!!

वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...!!!

एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून ....
किंवा एखाद वर्ष खूष होत असेल  , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून !!!

जाऊ दे ...  सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवते ....
संकल्पाच नाहीच ठरत आहे अजून ...!!!!




3 comments:

aativas said...

वर्षांना आपली भाषा येत असती तर :-)

प्रसाद कुलकर्णी said...

मला तर येणारे वर्ष एकदम भारी जाणार आहे .. :)

apurva said...

सविता ताई: तू सांगितल्याप्रमाणे दुरूस्त्या केल्या :)
आणि हो , खर च वर्षांना आपली भाषा यायला पाहिजे होती ... खूप बडबड केली असती मी त्यांच्याबरोबरही !!!!

Post a Comment